गजानन शेलार अखेर पोलिसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:56 IST2017-09-21T00:55:57+5:302017-09-21T00:56:29+5:30
नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले तसेच जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर फरार झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार बुधवारी (दि़२०) सकाळी भद्रकाली पोलिसांना शरण आले़ पोलिसांनी शेलार यांना अटक केली असून, गुरुवारी (दि़२१) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे़

वाकडी बारवपासून सुरू झालेल्या मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रथम भद्रकाली व त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापक गजानन शेलार व मंडळाच्या पदाधिकाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तर शेलार हे अटक टाळत होते.
गजानन शेलार हे सकाळी भद्रकाली पोलिसांना शरण आल्यानंतर दुपारी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते़ गुरुवारी शेलार यांना जिल्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे़ न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण आदेशाचे उल्लंघन करून अंमलबजावणी करणाºया पोलीस यंत्रणेला प्रतिआव्हान देणाºया शेलारांना पकडण्यासाठी पोलीसही इरेला पेटले होते़