शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ११ डिसेंबर २०२५: अचानक धनलाभाचा योग, प्रकृतीचा त्रास होणार
3
"६ महिन्यापासून पगार नाही, घर सांभाळणंही कठीण झालं..."; पाकिस्तानातील अधिकाऱ्याचा Video व्हायरल
4
लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
5
इंडिगोचे अध्यक्ष मेहतांचा अखेर माफीनामा; म्हणे... चूक झाली, मनापासून माफी मागतो!
6
लोकशाहीच्या पायावरच प्रहार? मतदारयादीची विश्वसनीयता हाच निवडणूक प्रक्रियेचा मूलाधार
7
इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
8
वैद्यकीय विश्वाच्या या विचित्र घुसमटीचं काय करावं?
9
महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
10
जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
11
गोव्याच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडे ‘बॉडी कॅमेरा’; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट : प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने
12
सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही!
13
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
14
भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
15
ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
16
वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
17
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
18
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
19
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
20
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'डेटिंग ॲप'द्वारे मैत्री करत युवतींवर अत्याचार करणारा गजाआड;मुरबाडमधून आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 20:16 IST

पिडित मुलीशी चॅटिंग करत तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री करत नंतर प्रेमसंबंध असल्याचे सांगून आपण कोर्टात जाऊन लग्न करु यवुतीला पाथर्डीफाटा येथुन झायलो कारमध्ये (एमएच१४ सीएक्स २५९५) या वाहनात बवसुन तिचा मोबाईल ताब्यात घेत तो बंद करत बळजबरीने थेट मुरबाडला घेऊन गेला.

ठळक मुद्दे साताऱ्यासह ठाण्यातही बलात्काराचा गुन्हा 

इंदिरानगर : सोशलमिडियाच्या माध्यमातून विविधप्रकारच्या ह्यडेटिंग ॲपह्णद्वारे संवाद साधून विवाहित महिला व युवतींसोबत मैत्री करत त्यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा बनाव करत लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुरबाडमधून इंदिरानगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुध्द सातारा, ठाणे जिल्ह्यात यापुर्वी बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे.‌इंदिरानगर परिसरातून दोन महिन्यांपुर्वी एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात होता. युवतीचा शेअर चॅट ॲपलिकेशनद्वारे‌ एका व्यक्तीशी संपर्क झाल्याचे तपासात पुढे आले.

संशयित वैभव लक्ष्मण पाटील (रा.मुरळी, ता.पाटण, जि.सातारा) याच्यासोबत घरातून डिसेंबर महिन्यात गेल्याची माहिती समजली. सातत्याने पाटील याच्या मागावर इंदिरानगरमधील पोलिसांचे पथक होते; मात्र कोठूनही त्याचा सुगावा लागू शकत नव्हता. मुरबाड, ठाणे, सातारा, महाड या शहरांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते. मुरबाडमधील एका खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे पथकाने तेथे सापळा रचला. उपनिरीक्षक प्रवीण बाकले, सुहासिनी बारेला, जावेद खान आदिंनी संशयित पाटील यास शिताफीने अटक केली. तसेचच त्याच्या तावडीतून बेपत्ता मुलीची सुखरुपपणे सुटकाही केली. त्याच्याविरुध्द यापुर्वी ठाणे जिल्ह्यातील रबाडा पोलीस ठाण्यासह साताऱ्यात बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पाटीलविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.२०) पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास बारेला या करीत आहेत.

...असा केला विश्वास संपादनपिडित मुलीशी चॅटिंग करत तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री करत नंतर प्रेमसंबंध असल्याचे सांगून आपण कोर्टात जाऊन लग्न करु यवुतीला पाथर्डीफाटा येथुन झायलो कारमध्ये (एमएच१४ सीएक्स २५९५) या वाहनात बवसुन तिचा मोबाईल ताब्यात घेत तो बंद करत बळजबरीने थेट मुरबाडला घेऊन गेला. विवाहच्या नावाखाली त्याने पिडितेकडील दीड तोळ्याचे दागिने काढून घेत बनावट नोटरी केल्याचे कागदपत्रे दाखवून फसवणुक तर तिच्या इच्छेविरुध्द सलग काही दिवस शारिरिक संबंध प्रस्थापित करत लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात पुढे आले आहे.--- 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकWomenमहिलाSatara areaसातारा परिसरthaneठाणेmurbadमुरबाड