नाईक महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST2021-02-24T04:16:31+5:302021-02-24T04:16:31+5:30

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात संत गाडगेबाबा व माजी मंत्री तुकाराम दिघोळे ...

Gadge Baba Jayanti celebration at Naik College | नाईक महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती साजरी

नाईक महाविद्यालयात गाडगेबाबा जयंती साजरी

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात संत गाडगेबाबा व माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप होते. यावेळी संत गाडगेबाबा व तुकाराम दिघोळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगे बाबांनी केलेले समाज प्रबोधनाचे कार्य तसेच तुकाराम दिघोळे यांचा राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रल्हाद दुधाने यांनी केले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनील उगले सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

फोटो- २३ दिघोळे जयंती

===Photopath===

230221\23nsk_43_23022021_13.jpg

===Caption===

फोटो- २३ दिघोळे जयंती 

Web Title: Gadge Baba Jayanti celebration at Naik College