गाडेकर मळा येथील साई मंदिराचा वर्धापनदिन

By Admin | Updated: December 2, 2015 22:24 IST2015-12-02T22:23:16+5:302015-12-02T22:24:41+5:30

गाडेकर मळा येथील साई मंदिराचा वर्धापनदिन

Gadekar Anniversary of the temple of Sai in Mala | गाडेकर मळा येथील साई मंदिराचा वर्धापनदिन

गाडेकर मळा येथील साई मंदिराचा वर्धापनदिन

नाशिकरोड : दत्तमंदिररोड गाडेकर मळा येथील श्री साईबाबा मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी सायंकाळी श्री सार्इंची शाही पालखीची शोभायात्रा काढण्यात आली होती.
गाडेकर मळा येथील श्री साईबाबा मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारपासून रविवारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी मंदिरापासून एका सजविलेल्या बग्गीमध्ये साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साई शाही पालखी मिरवणूक काढण्यात आली होती.
शोभायात्रेमध्ये घोडेस्वार, कलशधारी महिला, परिसरातील भाविक, रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेत साऊंड सिस्टीमवर लावण्यात आलेले श्री साईबाबांच्या धार्मिक गीतांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शनिवारी सकाळी साईयाग होमहवन, यज्ञ, ११ वाजता मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप व सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. नवनाथ महाराज थेटे गिरणारे
यांचे हरीकीर्तन होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gadekar Anniversary of the temple of Sai in Mala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.