शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

गावठी कट्टे अन् जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:16 AM

आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने या कालावधीत जिल्ह्यात कोठेही कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी ग्रामीण पोलीस दलाला ‘अलर्ट’ दिला आहे.

नाशिक : आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने या कालावधीत जिल्ह्यात कोठेही कुठल्याहीप्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी ग्रामीण पोलीस दलाला ‘अलर्ट’ दिला आहे. ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात आचारसंहिता काळात चोख बंदोबस्त ठेवत ५० तलवारींसह पाच गावठी कट्टे, डझनभर जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.लोकसभा निवडणूक काळात कोठेही कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यादृष्टीने शहर व ग्रामीण पोलीस दक्षता घेत आहेत. ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेसह, ग्रामीण सायबर पोलिसांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून जिल्ह्यतील कुठल्याही कोपऱ्यात गुन्हे घडविण्याचा प्रयत्न होत असल्यास गुन्हेगारांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. यानुसार जिल्ह्यात विशेष पथके गस्तीवर आहेत. आचारसंहिता सुरू झाल्यापासून अद्याप जिल्ह्यातील ४७ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. ५७ गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव पुढे कारवाईसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पेठ गावाजवळ निवडणूक आयोगाचे भरारी पथक व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत सुमारे १९ लाख रुपयांची रोकड एका मोटारीतून जप्त केली होती. तसेच अद्याप जिल्ह्यात विविध ठिकाणी चालणारे हातभट्टी दारूचे अड्डेही उद्ध्वस्त करण्यात आले असून आतापर्यंत २० हजार ८३६ लिटर दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे १७ लाख १४ हजार ८१३ रुपये इतकी आहे. तसेच जायखेडा शिवारात नंदुरबारच्या सीमेजवळ ग्रामीण पोलिसांनी २ हजार १५० जिलेटीन कांड्या व १ हजार ७५० डेटोनेटरचा साठा जप्त करत राजस्थानच्या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. जिल्'ातील ३१८ गुन्हेगारांपैकी ३२२ संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.मोदींची सभा; यंत्रणा सज्जपिंपळगाव बसवंत येथे येत्या सोमवारी (दि.२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, सभास्थळी जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान मोदी यांची सभा जिल्ह्यात होऊ घातल्याने साहजिकच सुरक्षाव्यवस्थादेखील तितकीच महत्त्वाची असल्यामुळे दस्तुरखुद्द पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी वैयक्तिकपणे चोख सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष देत संपूर्ण बंदोबस्ताची आखणी केली आहे. कुठल्याही प्रकारे बंदोबस्तात उणीव राहणार नाही, याबाबत ग्रामीण पोलीस प्रशासन खबरदारी घेताना दिसून येत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक