गावठी कट्टा जप्त
By Admin | Updated: October 23, 2015 22:38 IST2015-10-23T22:31:41+5:302015-10-23T22:38:26+5:30
गावठी कट्टा जप्त

गावठी कट्टा जप्त
नाशिक : सातपूर परिसरातील एका युवकाकडून गावठी कट्टा जप्त केला असून, त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ लवाटेनगरमध्ये राहणारा सुनील भीला चव्हाण (२०) याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ चव्हाण कट्टा घेऊन जात असताना पोलिसांनी त्याच्याकडून कट्टा जप्त केला़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्त्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)