निमगावी लष्करी जवान संदीप हिरे यांच्यावर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: December 25, 2014 01:11 IST2014-12-25T01:11:26+5:302014-12-25T01:11:26+5:30

निमगावी लष्करी जवान संदीप हिरे यांच्यावर अंत्यसंस्कार

Funeral on Nimgawi military junior Sandeep Hiray | निमगावी लष्करी जवान संदीप हिरे यांच्यावर अंत्यसंस्कार

निमगावी लष्करी जवान संदीप हिरे यांच्यावर अंत्यसंस्कार

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी व सैन्य दलातील जवान संदीप सुभाष हिरे (२३) यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप हिरे हा गेल्या दोन वर्षांपूर्वी २७ डिसेंबर २०१२ ला युनिट १० इन्फेन्ट्रीमध्ये दाखल झाला होता. राजस्थानातील सुरजगड येथे कार्यरत असताना त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला होता. त्याला कर्करोगासारखा दुर्धर आजार झाल्याने त्याची प्रकृती खालावली होती. त्याच्यावर दिल्ली येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया होऊन उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दिल्लीहून विमानाने औरंगाबाद येथे त्याचे शव आणून शासकीय वाहनाने रात्री त्यांच्या हिवरेमळा वस्तीवर त्याचे शव आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. यानंतर सजविलेल्या वाहनातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रासह शासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
मालेगावजवळ
अपघातात दोन ठार
ंमालेगाव : तालुक्यातील मनमाड रस्त्यावरील कौळाणे-सोनज फाट्यावर गॅस टँकर व आयशर गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनचालक जागीच ठार झाले. सखाराम दगा भोसले (५०) रा. झोडगे व प्रल्हाद जगन्नाथ चौधरी (५०) रा. मध्यप्रदेश हे दोघे ठार झाले. गणेश निंबा शेवाळे (२३) रा. रुग्णवाहिकेच्या चालकाने तालुका पोलिसात खबर दिली. गॅस टँकर आणि आयशर गाडी यांच्यात मालेगाव - मनमाड रस्त्यावर पहाटे दोन वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक होवून अपघात झाला.

Web Title: Funeral on Nimgawi military junior Sandeep Hiray