शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अजंग-वडेल गावात गावात शोकाकूल वातावरणात ट्रॅक्टर दुर्घटनेतील मयत महिलांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:08 IST

नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग-वडेल गावात मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या टॅक्टर दुर्घटनेत सात मयत महिलांच्या दुर्देवी मृत्यू झाला. या महिलांच्या मृतदेहावर दुपारी  शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दोन्ही गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मालेगाव तालुक्यातील अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहिरी तलावात शेतमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर मंगळवारी संध्याकाळी ट्रॉलीसह तलावात उलटला. या दुर्घटनेत वडेल गावातील ...

ठळक मुद्दे टॅक्टर दुर्घटनेत सात मयत महिलांच्या दुर्देवी मृत्यू झाला.   शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार  शेतमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर मंगळवारी संध्याकाळी ट्रॉलीसह तलावात उलटला.

नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग-वडेल गावात मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या टॅक्टर दुर्घटनेत सात मयत महिलांच्या दुर्देवी मृत्यू झाला. या महिलांच्या मृतदेहावर दुपारी  शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दोन्ही गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मालेगाव तालुक्यातील अजंग-दाभाडी रस्त्यावरील ढवळीविहिरी तलावात शेतमजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर मंगळवारी संध्याकाळी ट्रॉलीसह तलावात उलटला. या दुर्घटनेत वडेल गावातील सात महिलांचा मृत्यू झाला असून पंधराहून अधिक महिला-पुरूष गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर अजंग व वडेल या दोन्ही गावे शोकसागरात बुडाली असून गावक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांनी दोन्ही गावांना आज सकाळी भेट देत रास्ता रोको करणा:या रहिवाशांची समजूत काढून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेत महिलांचे मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली.दरम्यान, महाजन व भुसे यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्याचे जाहीर केले. तसेच सर्व जखमींचा खर्च शासन उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर नागरिकांचा रोष कमी झाला व महिलांचे मृतदेह ताब्यात घेण्यास तयारी दर्शविली.  या घटनेने नाशिक जिल्ह्यासह संपुर्ण राज्य हादरले आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात