शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कॅन्टोन्मेंट बोर्डांना पहिल्यांदाच निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:23 IST

देवळाली कॅम्प : पंधराव्या वित्त आयोगाकडून चालू आर्थिक वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून, त्यात देशभरातील कॅन्टोन्मेट बोर्डांना केंद्र सरकारने पहिल्यांदाच विकासकामांसाठी भरघोस अनुदान दिले आहे. त्यातूनच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास ९३ लाख २३ हजार ८३५ रुपये अनुदान मिळाले आहे. कॅन्टोन्मेंटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निधी प्राप्त झाला आहे.

देवळाली कॅम्प : पंधराव्या वित्त आयोगाकडून चालू आर्थिक वर्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून, त्यात देशभरातील कॅन्टोन्मेट बोर्डांना केंद्र सरकारने पहिल्यांदाच विकासकामांसाठी भरघोस अनुदान दिले आहे. त्यातूनच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास ९३ लाख २३ हजार ८३५ रुपये अनुदान मिळाले आहे. कॅन्टोन्मेंटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निधी प्राप्त झाला आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून वित्त आयोगाचा लाभ कॅन्टोन्मेंट बोर्डास मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून प्रयत्न होत होते. कॅन्टोन्मेंट कायदा-२००६नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे कटक मंडळांनादेखील केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा अशी तरतूद केली आहे.गेल्या पाच वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांनी वित्त आयोगाचा लाभ कायद्याप्रमाणे मिळावा, अशी मागणी केली होती. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र शासनाकडून चालू आर्थिक वर्षातील एक लाख लोकसंख्या आतील गटासाठी मूलभूत अनुदानाचा पहिला अंतरिम ३०५ कोटी सर्व पात्र ‘ड’ वर्ग महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती व कटक मंडळांना लोकसंख्या तसेच क्षेत्रफळ या निकषांच्या आधारावर निधी देण्यात आला आहे. सदर अनुदानातून चालू वित्तीय वर्षात विकासकामांसाठी खर्च करायाचा आहे.----------------------------------विकासकामांना लागणार हातभारदेवळालीसह राज्यातील ७ कटक मंडळांना हा निधी प्राप्त झाला आहे. त्यात देवळाली (९३, २३, ८३५), अहमदनगर (४६, ४३, १०६), देहूरोड पुणे (८४, १६, ७१९), खडकी, पुणे (१, ०५, १५, ८२८), औरंगाबाद (२९, ८२, ७१४), नागपूर, कामटी (२३, ७३, ७९०), पुणे कॅन्टोन्मेंट (१, ०६, ७७, १२०) यांचा समावेश आहे. लॉकडाउनच्या काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना वित्त आयोगाकडून काही प्रमाणात का होईना विकासकामांना हातभार लागला जाणार आहे.--------------------------------इतिहासात प्रथमच कटक मंडळांचा समावेश केंद्रीय वित्त आयोगात होऊन त्यांच्या शिफारसीनुसार लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या निकषावर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास पहिल्या टप्प्याचा निधी रुपये ९३ लाख उपलब्ध झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड शिष्टमंडळाने यासंदर्भात तीनवेळा बैठका घेतल्या होत्या. विद्यमान राज्य सरकारनेही याकामी तत्काळ निर्णय घेतल्याने हे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातून सर्व वॉर्डातील विकासकामांना खर्च केला जाणार आहे.- भगवान कटारिया, उपाध्यक्ष, कॅन्टोन्मेंट बोर्ड, देवळाली

टॅग्स :Nashikनाशिक