शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक शाळांना सहा महिन्यांत निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:21 IST

नाशिक : राज्यातील १३ हजार २२८ शाळांच्या दुरवस्थेचे वास्तव मांडणारे सर्वेक्षण ‘लोकमतने’ प्रसिद्ध केल्यानंतर खारघर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यभरातील ...

नाशिक : राज्यातील १३ हजार २२८ शाळांच्या दुरवस्थेचे वास्तव मांडणारे सर्वेक्षण ‘लोकमतने’ प्रसिद्ध केल्यानंतर खारघर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यभरातील धोकादायक शाळांच्या दुरुस्तीसाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयात शिक्षण विभागाला संबंधित शाळांच्या दुरुस्तीसाठी सहा महिन्यांच्या आत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश केले आहेत.‘लोकमत’ने १३ जून २१०९  रोजी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील धोकादायक शाळांचे जिल्हानिहाय सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शाळा दुरुस्तीसाठी चारशे कोटींची व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सुमारे अडीच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. परंतु याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. जगन्नाथ खारगे यांनी रायगड जिल्ह्णातील श्रीवर्धन तालुक्यातल्या आटगाव येथील शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन धोकादायक शाळांची वास्तविकता जाणून घेत जुलै महिन्यात मुंबई उच्च न्यायालायत जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने राज्याच्या शिक्षण विभाग सचिवांना धोकादायक शाळांसाठी सहा महिन्यांच्या आत निधी उपलब्ध करून देण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. अ‍ॅड.जगन्नाथ खारगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र शासन आणि अन्य जबाबदार विभागांच्या विरोधात ही याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग व न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने १ आॅगस्ट २०१९ रोजी निकाल देत महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग सचिव यांना जिल्हा परिषद शाळांच्या धोकादायक इमारतींच्या सद्यस्थितींबाबत अहवाल मागवून राज्य शासनाच्या वित्त विभागासोबत समन्वय साधत पडलेल्या शाळांच्या इमारतींची दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहा महिन्यांच्या आत कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती याचिकाकर्ते अ‍ॅड. जगन्नाथ खारगे यांनी दिली आहे.कोट-‘लोकमत’ने राज्यभरातील धोकादायक शाळांचे वास्तव सर्वेक्षणाद्वारे मांडल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष श्रीवर्धनच्या आटगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट दिली. याठिकाणी शाळेची भीषण दुरवस्था झालेली असल्याचे लक्षात आले. येथील विद्यार्थी गळणाऱ्या वर्गात अतिशय धोकादायक परिस्थितीत शिक्षण घेत होते. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण देणाºया अशा जिल्हा परिषदांच्या शाळांकडे सरकारने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.-अ‍ॅड. जगन्नाथ खारगे, याचिकाकर्ते 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळाStudentविद्यार्थी