कालिका ट्रस्टच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी निधी
By Admin | Updated: October 23, 2015 21:57 IST2015-10-23T21:55:49+5:302015-10-23T21:57:47+5:30
कालिका ट्रस्टच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी निधी

कालिका ट्रस्टच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी निधी
नाशिक : शहराचे ग्रामदैवत असलेल्या प्राचीन श्री कालिका देवी मंदिर देवस्थानच्या वतीने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून एक लाख रुपयांचा निधी शासनाला देण्यात आला.
ट्रस्टचेच्या वतीने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांना हा धनादेश देण्यात आला. कालिका देवी ट्रस्ट ही धार्मिक कार्यक्रमांबरोबराच सामाजिककार्यातही योगदान देत असते. त्याअंतर्गतच राज्यात विविध ठिकाणी पडलेल्या दुष्काळामुळे मदत म्हणून हा निधी देण्यात येत असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते मंदिरात शस्त्रपूजा करण्यात आली. यावेळी डॉ. प्रदीप पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, माहिती महासंचालक शिवाजी मानकर, महापालिकेचे कालिका ट्रस्टच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी निधीउपआयुक्तरोहिदास बहिरम आदि उपस्थित होते.