ग्रामीण भागातील विकासकामांसाठी निधी
By Admin | Updated: January 3, 2016 22:07 IST2016-01-03T22:06:03+5:302016-01-03T22:07:55+5:30
ग्रामीण भागातील विकासकामांसाठी निधी

ग्रामीण भागातील विकासकामांसाठी निधी
मालेगाव : तालुक्यातील मालेगाव बाह्य मतदारसंघातील ग्रामपंचायतींना जनसुविधा अनुदान योजनेंतर्गत विकासकामांसाठी १ कोटी २८ लक्ष रुपये मंजूर झाल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी, कुकाणे, लोणवाडे, ढवळेश्वर, पांढरुण, कौळाणे (गा.), पोहाणे, आघार खु।।, नांदगाव, भिलकोट, कंक्राळे, भारदेनगर, चिखल
ओहोळ, गाळणे, हाताणे, वाके, सांजवहाळ, शेंदुर्णी आदि गावांत स्मशानभूमी बांधणे, स्मशानभूमी दुरुस्ती करणे, दशक्रिया विधी शेड बांधणे, कब्रस्तानला संरक्षक भिंत बांधणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे इत्यादि कामांसाठी जिल्हा योजनेंतर्गत जनसुविधा अनुदानातून निधी उपलब्धतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावित कामांना मंजुरी देऊन एक कोटी २८ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला.(प्रतिनिधी)