शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

चांदवड-विंचूर रस्त्यासाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:43 IST

नाशिक : शासनच्या हायब्रिड अन्यूईटी योजनेअंतर्गत चांदवड-लासलगाव-विंचूर रस्त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सध्या आॅर्थररोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी कारागृहातूनच सरकारशी पत्रव्यवहार करून लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मागण्यांना सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ठळक मुद्देभुजबळांचे कारागृहातून चंद्रकांत पाटील यांना पत्र मतदारसंघातील प्रश्नांसाठी कारागृहातूनच सरकारशी पत्रव्यवहार

नाशिक : शासनच्या हायब्रिड अन्यूईटी योजनेअंतर्गत चांदवड-लासलगाव-विंचूर रस्त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सध्या आॅर्थररोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी कारागृहातूनच सरकारशी पत्रव्यवहार करून लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मागण्यांना सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या पत्रात भुजबळ यांनी म्हटले आहे की, चांदवड-लासलगाव-विंचूर हा २५ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी विंचूर येथे रास्ता रोको आंदोलने व निदर्शने करण्यात आलेली आहेत. शासनाच्या हायब्रिड अ‍ॅन्यूईटी योजनेतून या रस्त्याचे काम करण्याची त्यांनी शासनाकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे.यापूर्वीही भुजबळ यांनी दि. २२ जानेवारी २०१८ व १७ नोव्हेंबर २०१७ रोजी शासनाच्या हायब्रिड अ‍ॅन्यूईटी योजनेत या कामाचा समावेश करून हे काम अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केलेली आहे.शासनाच्या या प्रकल्पांतर्गत करण्यात येणाºया रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून ४० टक्के, तर विकासकाकडून ६० टक्के रक्कम खर्च करून सदर रस्त्यांची कामे पूर्ण केली जातात.या रस्त्याची पुढील पंधरा वर्षांकरिता निगा राखण्याची जबाबदारी विकासकावरच असते. त्या मोबदल्यात राज्य शासन विकासकाला पुढील पंधरा वर्षांत उर्वरित ६० टक्के रक्कम व्याजासह टप्प्याटप्प्याने देत असते. त्यामुळे हायब्रिड अन्यूईटी प्रकल्पामध्ये या रस्त्याचा समावेश झाल्यास सदर रस्त्याची पुढील १५ वर्षांपर्यंत योग्य निगा राखली जाणार आहे. याचा फायदा नागरिकांना होणार असून, पुढील १५ वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मिटणार आहे.चांदवड-लासलगाव-विंचूर हा २५ किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे.हायब्रिड अन्यूईटी प्रकल्पामध्ये या रस्त्याचा समावेश झाल्यास सदर रस्त्याची पुढील १५ वर्षांपर्यंत योग्य निगा राखली जाणार आहे.