नाशिककरांनी अनुभवला पौर्णिमेचा सुपरमून
By Admin | Updated: November 15, 2016 02:40 IST2016-11-15T02:39:47+5:302016-11-15T02:40:54+5:30
नाशिककरांनी अनुभवला पौर्णिमेचा सुपरमून

नाशिककरांनी अनुभवला पौर्णिमेचा सुपरमून
नाशिक : पौर्णिमेच्या दिवशी नाशिककरांना आकाशात सर्वांत मोठ्या आणि तेजस्वी अशा चंद्राचे दर्शन घडले. ६९ वर्षांनंतर आलेल्या या दुर्मिळ योगाचे अनेक नाशिककर साक्षीदार ठरले. हा अविस्मरणीय क्षण अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केला.
त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवात सर्वांत मोठ्या चंद्राचे म्हणजेच ‘सुपरमून’चे दर्शन घडणार असल्याने या घटनेविषयी नाशिककरांमध्ये उत्सुकता होती. ६९ वर्षांनंतर नेहमीपेक्षा चंद्र मोठा पहावयास मिळाला. नाशिकमध्ये सायंकाळी या सुपरमूनचे दर्शन नाशिककरांना घडले.
अनेक खगोलप्रेमींनी घराच्या छतावर जाऊन दुर्बिणीच्या सहाय्याने चंद्राचा अनुभव घेतला. त्रिपुरारी पौर्णिमेसाठी गोदाकाठी जमलेल्या नाशिककरांनी गोदाकाठावरूनच या सुपरमूनचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)