शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रांना मिळणार पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 16:07 IST

रुग्णांना मिळणार दिलासा : बीएएमएस डॉक्टर्स उपलब्ध होणार

ठळक मुद्देजिल्हयात १०४ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५७१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत.

जायखेडा : जिल्हयातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस अर्हताप्राप्त वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील रु ग्णांची होत असलेली हेळसांड रोखण्यासाठी १०४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बीएएमएस धारक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार यांनी दिली.जिल्हयात १०४ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५७१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. यासाठी २०८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असूनही केवळ ७४ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अवलंबून आहे. त्यामुळे रु ग्णांना उपचार घेतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय अधिकारी अभावी जिल्ह्यातील रु ग्णांना वैद्यकीय उपचारासाठी खासगी रु ग्णालये, अथवा मुंबई, पुण्यातील शासकीय रु ग्णालयांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिक-यांची रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याची मागणी ग्रामीण भागातून वारंवार करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हयातील वैद्यकीय अधिका-यांच्या रिक्त पदांबाबत आरोग्य सभापती यतीन पगार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन रु ग्णाची होत असलेली हेळसांड व गैरसोय लक्षात आणून दिली. त्यानंतर भुजबळ यांनी याप्रश्नी आरोग्यमंत्र्यांची तातडीने भेट घेऊन बीएएमएस अहर्ता धारक वैद्यकीय अधिका-यांची नेमणुक करण्याची मागणी केली. यास आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, एमबीबीएस धारक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झालेल्या आरोग्य केंद्रांमध्ये बीएएमएस धारक वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याने ग्रामीण रु ग्णांना तत्पर व योग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य