कालिकेच्या भाविकांमुळे फुलले समांतर रस्ते
By Admin | Updated: September 26, 2014 00:42 IST2014-09-26T00:42:05+5:302014-09-26T00:42:31+5:30
कालिकेच्या भाविकांमुळे फुलले समांतर रस्ते

कालिकेच्या भाविकांमुळे फुलले समांतर रस्ते
इंदिरानगर : समांतर रस्ते ग्रामदेवता कालिकादेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी फुललेले दिसून येत आहेत.
मुंबई-आग्रा महामार्गावरील वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता मनपाने समांतर रस्ता तयार केला. यामुळे समांतर रस्त्यालगत असलेल्या विविध उपनगरांतील नागरिकांची सोय झाली. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू
असते.
नवरात्रोत्सवात इंदिरानगर, दीपालीनगर, विनयनगर, राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर, वासननगर, सिडकोसह विविध उपनगरांतील महिला, युवती, युवक व नागरिक पायी दर्शनासाठी सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे हे समांतर रस्ते सकाळ-सायंकाळी गर्दीने फुलून गेलेले असतात. यामुळे नेहमी वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यावर भाविकांची वर्दळ सुरू झाल्याचे दिसून येते. यामध्ये महिला व युवतींचे प्रमाण लक्षणीय आहे. (वार्ताहर)