रखडलेल्या साठफुटी रस्त्यावरील अतिक्रमणावर ‘फुली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST2021-06-23T04:11:15+5:302021-06-23T04:11:15+5:30
वडाळा चौफुलीपासून तर थेट कब्रस्तानच्या पाठीमागून रजा चौकातून रामोशीवाडामार्गे शंभरफुटी श्री.श्री.रविशंकर मार्गाला जोडणारा विकास आराखड्यातील साठफुटी मंजूर रस्त्याची सुमारे ...

रखडलेल्या साठफुटी रस्त्यावरील अतिक्रमणावर ‘फुली’
वडाळा चौफुलीपासून तर थेट कब्रस्तानच्या पाठीमागून रजा चौकातून रामोशीवाडामार्गे शंभरफुटी श्री.श्री.रविशंकर मार्गाला जोडणारा विकास आराखड्यातील साठफुटी मंजूर रस्त्याची सुमारे १ कोटी रुपयांची निविदा (टेंडर) मनपाकडून काढण्यात आली आहे. हा रस्ता विकसित करणे गावाच्या भविष्याच्यादृष्टीने अत्यावश्यक आहे. गावामध्ये ये-जा करण्यासाठी सध्याचा रस्ता हा अपुरा पडतो. मागील दहा वर्षांत गावाच्या लोकसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. गावठाण भागातून जाणारा हा प्रस्तावित रस्ता अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. वर्षानुवर्षांपासून या साठफुटी रस्त्याच्या जागेत अतिक्रमणे वाढीस लागलेली आहेत. या हद्दीतील अतिक्रमित अवैध घरे, दुकानांच्या बांधकामावर प्रशासनाच्यावतीने लाल रंगाची धोक्याची फुली मारली आहे. या भागात अतिक्रमण करणाऱ्या रहिवाशांना अप्रत्यक्षपणे प्रशासनाने या माध्यमातून धोक्याची इशारावजा सूचना दिली आहे.
---इन्फो---
डांबरीकरणाच्या हालचाली सुरू
मनपाने वडाळ्याचा संवेदनशील भाग म्हणून या भागात वाढणाऱ्या अतिक्रमणांच्या समस्येकडे आतापर्यंत दुर्लक्ष केले. परिणामी रस्ता विकासामध्ये आता अतिक्रमणांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने मनपाकडून या रस्त्याचे सुमारे १२ मीटरपर्यंत खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे सर्वेक्षण करत १८ मीटरपर्यंतची हद्द मोजून ती निश्चित करण्यात आली.
---इन्फो---
काँक्रिटीकरणाला सुरुवात कधी?
वडाळा गावातून केबीएच विद्यालयासमोरून जाणारा रहदारीचा सध्याचा मुख्य रस्ता महिनाभरापासून मनपाने काँक्रिटीकरणाकरिता खोदून ठेवला आहे. या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सुमारे १ कोटीचे हे काम असून रस्ता हा थेट पांढरी आईदेवी चौकापर्यंत विकसित केला जाणार आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने कामाला गती देत लवकरात लवकर काँक्रिटीकरण सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
===Photopath===
220621\22nsk_9_22062021_13.jpg~220621\22nsk_10_22062021_13.jpg
===Caption===
वडाळागाव~लाल खुणा