ओतूर ग्रामपंचायतची वचनपूर्ती; घंटागाडी व फवारणी यंत्राचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST2021-08-19T04:18:54+5:302021-08-19T04:18:54+5:30
ग्रामपंचायतच्या १५व्या वित्त आयोगातून ग्रामस्वच्छतेसाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर ओतूर ग्रामपंचायतने ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच फवारणी यंत्र खरेदी केले. ...

ओतूर ग्रामपंचायतची वचनपूर्ती; घंटागाडी व फवारणी यंत्राचे लोकार्पण
ग्रामपंचायतच्या १५व्या वित्त आयोगातून ग्रामस्वच्छतेसाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर ओतूर ग्रामपंचायतने ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच फवारणी यंत्र खरेदी केले. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे यांच्या हस्ते ओतूरचे उपसरपंच मंगेश देसाई, दिगंबर पवार, ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे ट्रॅक्टर वितरक चंद्रकांत कोठावदे यांनी ट्रॅक्टरच्या चाव्या सुपुर्द केल्या.
शासनाच्या योजनेतून ओतूर गावातील दैनंदिन ग्रामसफाई, घाण कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर व ट्रॉली यांची घंटागाडी व गावातील आरोग्य नियंत्रणसाठी जंतुनाशक फवारणीसाठी फवारणी यंत्र खरेदी करण्यात आल्याचे सरपंच पार्वताबाई गांगुर्डे यांनी सांगितले .
ओतूर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ट्रॅक्टरची ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पवार यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी दिगंबर पवार, युवराज मोरे, दादा मोरे, दीपक माळी, दीपक आहेर, मीराबाई पवार, सोनाली सोनवणे, जानव्ही मोरे, ग्रामसेवक भाऊराव ठाकरे आदी उपस्थित होते.
फोटो - १८ ओतूर ग्रामपंचायत
ओतूर ग्रामपंचायतच्या ट्रॅक्टरची चावी उपसरपंच मंगेश देसाई यांच्याकडे सुपुर्द करताना जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे, चंद्रकांत कोठावदे, दिगंबर पवार, ज्ञानेश्वर पवार, दीपक माळी आदी.
180821/18nsk_23_18082021_13.jpg
फोटो - १८ ओतूर ग्रामपंचायत ओतूर ग्रामपंचायतच्या ट्रॅक्टरची चावी उपसरपंच मंगेश देसाई यांच्याकडे सुपूर्द करतांना जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे, चंद्रकांत कोठावदे, दिगंबर पवार, ज्ञानेश्वर पवार दिपक माळी आदी.