शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हजार कोटींचा गंडा घालून फरार ठगाला बेड्या, 120 कोटींचं होतं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 10:17 IST

तिवारी हा नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून स्वत:ची ओळख, चेहरा बदलून एक मोठा कांदा व्यावसायिक पुनीत भारद्वाज नावाने  वावरत होता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमधील विविध शहरांमध्ये गुंतवणूकदार, खरेदीदारांची १ हजार कोटींची फसवणूक करून गेल्या सात वर्षांपासून फरार झालेला मोस्ट वाँटेड गुन्हेगार पीयूष तिवारी याला उत्तर दिल्ली पोलिसांच्या अँटी ऑटो थेफ्ट स्कॅाडने  (एएटीएस)  शनिवारी नाशिकमध्ये बेड्या ठोकल्या. 

तिवारी हा नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून स्वत:ची ओळख, चेहरा बदलून एक मोठा कांदा व्यावसायिक पुनीत भारद्वाज नावाने  वावरत होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. २०११ पासून बांधकाम व्यवसायाला पुनीतने सुरुवात केली. २०१८ पर्यंत त्याने १५ ते २० लहान व ८ मोठ्या कंपन्या सुरू केल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या मयूर विहार, आनंद विहारसह विविध पोलीस ठाण्यांत, तसेच उत्तर प्रदेशच्या नोएडा, सूरजपूर, तसेच पंजाबच्या अमृतसर शहरासह अन्य पोलीस ठाण्यांमध्ये मिळून सुमारे ३७ फसवणुकीचे गुन्हे पीयूषवर दाखल आहेत.  दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीसदेखील जाहीर केले होते. तो सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. 

‘इन्कम टॅक्स’च्या छाप्यात मिळाले १२० कोटींचे घबाडपीयूष तिवारी याच्या घरावर प्राप्तीकर विभागाने २०१६ रोजी छापा टाकला होता. यावेळी त्याच्याकडे १२० कोटींचे घबाड आढळले होते. त्यानंतर पीयूषने दिल्ली एनसीआरमध्ये फ्लॅट, प्लॉटस् विक्रीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना गंडा घालण्यास सुरुवात केली. दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी पीयूष तिवारी याने मिळविली आहे. तो मूळ उत्तर प्रदेशातील नोएडाचा आहे. 

 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी