हातगाड्या जाळपोळीतील फरार संशयित अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:15 IST2021-04-21T04:15:32+5:302021-04-21T04:15:32+5:30

गेल्या महिन्यात म्हसरूळ टेक येथे राहणाऱ्या गोवर्धने, शुभम जाधव व दर्शन सूर्यवंशी या संशयितांनी खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी खंडणी ...

Fugitive suspect arrested in handcart arson | हातगाड्या जाळपोळीतील फरार संशयित अटक

हातगाड्या जाळपोळीतील फरार संशयित अटक

गेल्या महिन्यात म्हसरूळ टेक येथे राहणाऱ्या गोवर्धने, शुभम जाधव व दर्शन सूर्यवंशी या संशयितांनी खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांनी खंडणी दिली नाही म्हणून मंदिरा बाहेर उभ्या तीन चायनीज गाड्या पेटवून दिल्याची घटना घडली होती. घटनेत चायनीज खाद्यपदार्थ विक्री हातगाड्या आणि साहित्य जळून खाक झाले होते याप्रकरणी पोलिसांनी जाधव व सूर्यवंशी यांना शिर्डीतून अटक केली होती सदर प्रकरणात गोवर्धन हा फरार झाला होता गुन्हे शाखा युनिट एक पथकाचे पोलीस हवालदार प्रवीण कोकाटे महेश साळुंखे परिसरात गस्त घालत असताना चायनीज हातगाड्या जाळपोळ प्रकरणातील संशयित गोवर्धने अमरधाम जवळ शितळा देवी मंदिर जवळ फिरत असल्याची गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी खात्री करून गोवर्धनेला ताब्यात घेत पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Web Title: Fugitive suspect arrested in handcart arson