शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नंदिनी पूररेषेतील अनधिकृत बांधकामांकडे मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:27 IST

गोदावरी नदीवरील पूररेषेतील लॉन्ससह अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही केल्यानंतर महापालिकेने आता नासर्डी तथा नंदिनी नदीपात्रालगत पूररेषेतील अनधिकृत बांधकामांकडे आपला मोर्चा वळविला आहे. अतिक्रमण विभागाकडून सदर बांधकामे हटविण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

नाशिक : गोदावरी नदीवरील पूररेषेतील लॉन्ससह अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही केल्यानंतर महापालिकेने आता नासर्डी तथा नंदिनी नदीपात्रालगत पूररेषेतील अनधिकृत बांधकामांकडे आपला मोर्चा वळविला आहे. अतिक्रमण विभागाकडून सदर बांधकामे हटविण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.  महापालिकेने गोदावरी नदीकिनारी असलेल्या लॉन्ससह अनधिकृत बांधकामांवर कारवाई मागील सप्ताहात पार पाडली. त्यात आनंदवल्ली शिवारात गोदावरी नदी किनारी असलेल्या आसारामबापू आश्रमातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालविला. त्यापाठोपाठ महापालिकेने ग्रीनफिल्ड लॉन्सची संरक्षक भिंतही पाडून टाकली, तर विश्वास लॉन्स व गंगाजल नर्सरीने स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेणे पसंत केले. मात्र, ग्रीनफिल्ड लॉन्सची संरक्षक भिंत ही उच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानाही महापालिकेने पाडून टाकल्याबद्दल न्यायालयाने त्याबद्दल आयुक्तांना जाब विचारला. त्यातून आयुक्तांना न्यायालयाची माफी मागावी लागली आणि पाडलेली भिंत पुन्हा बांधून देण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली.  सोमवारी (दि.२८) पंचवटीतील पूररेषेतील एका बांधकामाबाबत महापालिकेचे पथक कारवाईसाठी गेले असता, संबंधित जागामालकाने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याची कागदपत्रे सादर केल्याने पथक माघारी परतले. गोदावरी नदीकिनाऱ्यालगत पूररेषेतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविल्यानंतर महापालिकेने आता आपले लक्ष नासर्डी तथा नंदिनी नदीकडे केंद्रित केले आहे. सोमवारी (दि.२८) महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) किशोर बोर्डे व अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी नंदिनी नदीकिनारी पूररेषेत येणाया अनधिकृत बांधकामांची पाहणी केली.  सदर अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यासंबंधी नगररचना विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर तत्काळ अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे.मोजणीनंतर भिंतीचे कामग्रीनफिल्ड लॉन्सची पाडण्यात आलेली भिंत सहा ते आठ आठवड्यांत बांधून देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. महापालिकेकडून आता सदर पाडलेल्या भिंतीचे मोजमाप करून त्याचे इस्टिमेट तयार केले जाणार असल्याचे सांगितले जात असून, त्यासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची चर्चा आहे. परंतु, महापालिकेचा एकूणच पवित्रा पाहता सदर भिंत बांधून दिली जाणार किंवा नाही याबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाriverनदी