विविध मागण्यांसाठी येवल्यात मोर्चा

By Admin | Updated: February 23, 2016 23:35 IST2016-02-23T23:28:55+5:302016-02-23T23:35:23+5:30

विविध मागण्यांसाठी येवल्यात मोर्चा

Front row for various demands | विविध मागण्यांसाठी येवल्यात मोर्चा

विविध मागण्यांसाठी येवल्यात मोर्चा

येवला : तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व मागास वर्गावर होणाऱ्या अन्यायाविरु द्ध त्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा धडक मोर्चा तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली ८ मार्च रोजी तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे. शहरातील विंचूर चौफुलीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार शरद मंडलिक यांना देण्यात आले आहे.
या मोर्चात तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वारिप तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, तालुका कार्याध्यक्ष विजय घोडेराव, शहराध्यक्ष विक्रम पवार, अमोल निकम, शशिकांत जगताप, भाऊसाहेब गरुड, नवनाथ पगारे, अनिल घोडेराव, संतोष घोडेराव, चांगदेव गाढे यांनी केले
आहे. (वार्ताहर)

Web Title: Front row for various demands