इगतपुरी नगर परिषदेवर कचराडेपेाच्या निषेधार्थ मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाच्या पदाधिकार्यांचे नेतृत्व
By Admin | Updated: May 28, 2014 01:01 IST2014-05-26T21:28:12+5:302014-05-28T01:01:14+5:30
इगतपुरी- शहरातील गोळीबार मैदान येथील कचरा डेपोमुळे गोळीबारवाडीतील आदिवासीबांधवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचरा डेपोची पावसाळ्याअगोदर जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात यावी या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे पदाधिकारी आणि गोळीबारवाडीतील शेकडो महिला-पुरुषांनी नगर परिषदेवर आज मोर्चा काढला. मुख्याधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

इगतपुरी नगर परिषदेवर कचराडेपेाच्या निषेधार्थ मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाच्या पदाधिकार्यांचे नेतृत्व
इगतपुरी- शहरातील गोळीबार मैदान येथील कचरा डेपोमुळे गोळीबारवाडीतील आदिवासीबांधवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचरा डेपोची पावसाळ्याअगोदर जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात यावी या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे पदाधिकारी आणि गोळीबारवाडीतील शेकडो महिला-पुरुषांनी नगर परिषदेवर आज मोर्चा काढला. मुख्याधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शहरातील धम्मगिरीच्या मागे नगर परिषदेचा कचरा डेपो आहे. या कचराडेपोमुळे गोळीबारवाडीतील आदिवासी नागरिक त्रस्त आहेत. गोळीबारवाडीकडे जाणार्या मुख्य सीमेंट रस्त्यावर कचरा साचत असल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत. या कचरा डेपोमुळे जवळच नव्याने वसलेल्या श्री स्वामी समर्थ नगरवासीयांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या डेपोजवळून वाहणार्या नाल्यात हा कचरा जमा झाल्याने हा नाला तुंबला असून, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर सदर परिसराची साफसफाई करण्यात यावी, जेसीबी मशीनच्या सहाय्याने गोळीबारवाडीकडे जाणार्या रस्त्यावरील कचरा दूर करावा, नाल्यात साचलेला कचरा काढून घ्यावा आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.
या डेपोचा आढावा घेऊन आठ दिवसांत साफसफाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना देण्यात आला आहे. या मोर्चात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष सुनील रोकडे, जि.सेक्रेटरी लक्ष्मणराव कांबळे, बाळासाहेब गांगुर्डे, चंद्रकांत शिंदे, श्रावण झुगरे, कृष्णा कामडी, काशीनाथ कामंडी, गंगूबाई कामडी, पुष्पा कामडी, प्रमिला झुगरे, सुशीला पिंगळे आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)
---