वीज वितरण कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 00:05 IST2016-04-14T23:53:22+5:302016-04-15T00:05:16+5:30
पिंपळगाव बसवंत : खंडित वीजपुरवठा

वीज वितरण कार्यालयावर मोर्चा
पिंपळगाव बसवंत : वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.
५ एप्रिलपासून पालखेड डाव्या कालव्याला मनमाड, येवल्यासाठी पिण्याचे पाणी सोडल्याने कालव्यालगतचा वीजपुरवठा २८ तासांसाठी खंडित करण्यात आला होता. मात्र दोन तासांचा वीजपुरवठा सुरू होता. परंतु आता हा दोन तासांचा वीजपुरवठाही बंद झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. कालव्यापासून आठ ते दहा किमी अंतरावर असलेल्या गावाचाही वीजपुरवठा २२ तासांसाठी बंद करण्यात आला होता. सिंगल फेज योजनाही बंद पडल्याने रात्र अंधारात काढावी लागत होती.
वीज उपलब्ध नसल्याने पिण्याच्या पाण्याचेही नियोजन विस्कटले होते. आठ दिवसांपासून बहुतांश गावांना पाणीपुरवठा होत नव्हता. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश आल्याचे सांगत वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी कुठलाही आदेश दिला नसल्याचे स्पष्ट केले.
तानाजी बनकर, भास्कर बनकर, सुरेश खोडे यांनी मोर्चा काढत महावितरणच्या दारात ठिय्या मांडला. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. त्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले.
उंबरखेड येथील शेतकऱ्यांनी यापुढील वीजबिल न भरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. सिंगल फेज योजना बंद आहे. वीज नसल्याने गाव अंधारात असते, असे गांवकऱ्याचे म्हणणे आहे.
यावेळी संजय मोरे, काका मेंगाणे, साहेबराव देशमाने, बाळासाहेब बनकर, दिलीप देशमाने, लक्ष्मण खोडे, संदीप बनकर, भारत खोडे, देवा काजळे, संपत विधाते, रामकृष्ण कंक, राजेद्र निरघुडे, प्रभाकर बनकर, नंदू देशमाने, तुकाराम गवळी आदि उपस्थित
होते. (वार्ताहर)