डाक कर्मचाºयांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:20 IST2017-08-23T23:53:03+5:302017-08-24T00:20:10+5:30

ग्रामीण भागात काम करणाºया पोस्ट खात्यातील कर्मचाºयांनी आपल्या प्रलंबित पुकारलेल्या संपाच्या मंगळवारी सातव्या दिवशीही दखल घेण्यात न आल्याने अखेर संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी आज मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.

 Front of postal staff | डाक कर्मचाºयांचा मोर्चा

डाक कर्मचाºयांचा मोर्चा

मनमाड : ग्रामीण भागात काम करणाºया पोस्ट खात्यातील कर्मचाºयांनी आपल्या प्रलंबित पुकारलेल्या संपाच्या मंगळवारी सातव्या दिवशीही दखल घेण्यात न आल्याने अखेर संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी आज मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. संप सुरु करून सात दिवसाची कालावधी उलटल्या नंतरही सरकार आंदोलनाकडे लक्ष देत नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी संघटनेचे अध्यक्ष सी.जे.सोनवणे, उपाध्यक्ष प्रवीण गोसावी, सचिव धनराज आहिरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चाचा समारोप मुख्य पोस्ट कार्यालयाजवळ झाला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला शहरातील विविध राजकीय पक्षांसोबत सर्वसामान्य नागरिकांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी शौकत शेख, अनिल गुंजाळ, विठ्ठल भोसले, कल्पना पगारे, अनुसया दराडे, शारदा देवरे, शरद पवार, भगवान शेरेकर आदींसह मोठ्या संख्येने पोस्टमन व कर्मचारी उपस्थित होते.



 

Web Title:  Front of postal staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.