राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 23:25 IST2016-01-18T23:23:03+5:302016-01-18T23:25:34+5:30
शैक्षणिक शुल्क माफ करा अन्यथा आंदोलन

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचा मोर्चा
नाशिक : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सकाळी अकरा वाजता शहरातील बी. डी. भालेकर मैदान येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी अडवला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना संग्राम कोते पाटील यांनी, भाजप सरकारवर टीका केली. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क त्वरित माफ करण्यात यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, विद्यार्थी अध्यक्ष दीपक वाघ, शहराध्यक्ष गौरव गोवर्धने यांनीही मार्गदर्शन केले. मोर्चात अर्जुन टिळे, रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधुणे, छबू नागरे, सचिन पिंगळे, अंबादास खैरे, हेमंत शेट्टी, मनोहर कोरडे, प्रेरणा बलकवडे, आकाश पगार, प्रियंका शर्मा, वैभव देवरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.