पठाव्या रस्त्याला वटार फाट्याजवळ भागदाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:49 IST2019-04-07T16:48:33+5:302019-04-07T16:49:35+5:30
वटार : बागलाणच्या निसर्ग सौंदयात भर घालणार पश्चिम पट्टा, पण गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याच्या जवळ काटेरी बाभळीची झाडे झुडपे व खड्डे, रस्त्याना पडलेलं भागदाड अश्या अनेक कारणांमुळे पर्यटक येण्यास कंटाळा करत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग किती सतर्क आहे व लोकप्रतिनिधी मतदार किती दखल घेत आहेत ते दिसत आहे.

पठाव्या रस्त्याला पडलेल भगदाड व त्यावर टाकलेलं काटे.
वटार : बागलाणच्या निसर्ग सौंदयात भर घालणार पश्चिम पट्टा, पण गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याच्या जवळ काटेरी बाभळीची झाडे झुडपे व खड्डे, रस्त्याना पडलेलं भागदाड अश्या अनेक कारणांमुळे पर्यटक येण्यास कंटाळा करत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग किती सतर्क आहे व लोकप्रतिनिधी मतदार किती दखल घेत आहेत ते दिसत आहे.
येथील पाठवा रस्त्याला वटार फाट्याजवळ बऱ्याच दिवसापासून रस्त्याला भगदाड पडले आहे व त्याच्यावर्ती काट्यांच पांघरून घातलं आहे रस्ता वळणाचा असल्यामुळे समजतनाही जर दोन गाड्या सामोरा समोर आल्या तर साईड घ्यायला देखील जागा नाही अश्या परिस्थितीत करायचं काय असा सवाल वाहन चालकाला पडतो. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला हा रस्ता काटेरी झुडपाणी वेढला आहे तर अनेक छोट्या मोठ्या वळणावरती रस्ता देखील समजत नाही, साईट देण्याच्या नादात छोटे मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ह्या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते, परिसरातील १० ते १२ गावाचा संपर्क तालुक्याला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा मानला जातो व तालुका जवळही पडतो असे वाहनचालकांचे म्हणने आहे. परिसरातील नावाजलेल तीर्थक्षेत्र कपालेश्वरला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा मानला जातो तसेच निसर्गाने बहरलेला भवाडा डोंगर पहाण्यासाठीही पर्यटक ह्या रस्त्याला पसंती देतात पण गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम विभागाचे वक्र दृष्टी असल्यामुळे वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत.
रस्त्यावर काटेरी झाडे झाडांनी वेडा घातला असल्यामुळे रस्ता अरु ंद झाला आहे . पादचार्यांना चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे तर मालवाहतूक गाडी आली तर लहानमोठ्या वाहनचालकांना साईट घ्यायची पंचाईत पडते. परिणामी अपघातास निमंत्रण मिळते.
संबधित विभागाने तात्काळ दखल घेऊन सदर रस्ता दुरु स्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.