इपीएफ पेन्शनरांचा सोमवारी मोर्चा
By Admin | Updated: November 23, 2015 23:18 IST2015-11-23T23:18:09+5:302015-11-23T23:18:35+5:30
इपीएफ पेन्शनरांचा सोमवारी मोर्चा

इपीएफ पेन्शनरांचा सोमवारी मोर्चा
नाशिक : नाशिक जिल्हा इपीएफ पेन्शनर्स फेडरेशनतर्फे इपीएफ ९५ पेन्शनरांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयटीआय सिग्नलजवळील भविष्य निर्वाह निधी कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
कोशियारी समितीने सुचविल्याप्रमाणे तीन हजार रुपये पेन्शन तातडीने सुरू करावे, अन्नसुरक्षा, मोफत औषधोपचार, प्रवासात सवलत आदि सुविधाही इपीएफ पेन्शनरांना मिळाव्यात या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सैनिकांना एक रॅँक, एक पेन्शन लागू करण्यात आली आहे. मात्र भाजपाप्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी आश्वासन देऊनही कोशियारी समितीच्या शिफारसी लागू होत नसल्याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजू देसले, सुधाकर गुजराथी, डी. व्ही. जोशी, सुभाष काकड, शिवाजी शिंदे, प्रकाश नाईक आदिंनी केले आहे. (प्रतिनिधी)