दिंडोरी तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी मोर्चा
By Admin | Updated: July 19, 2014 00:43 IST2014-07-18T22:59:48+5:302014-07-19T00:43:51+5:30
दिंडोरी तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी मोर्चा

दिंडोरी तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी मोर्चा
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दुबार पेरणीही वाया जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यासाठी तालुक्यात त्वरित दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर किसान सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
दिंडोरी बाजार समिती पटांगण ते तहसील कार्यालयापर्यंत काँ. रमेश चौधरी, कैलास बलसाने, इंद्रजित गावित यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, कृषिअधिकारी सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. दिंडोरी तालुका दुष्काळी जाहीर करा, जनावरांच्या पाण्याची व चाऱ्याची सोय करा, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा, विभक्त कुटुंबीयांना पिवळे रेशनकार्ड द्या, गायरान जमीन कसणाऱ्या लाभार्थांच्या नावे करा, वृद्धापकाळ योजना व श्रावणबाळ योजनेची नवीन प्रकरणे मंजूर करा आदि मागण्यांचा त्यात समावेश आहे. यावेळी सुभाष चौधरी, इंद्रजित गावित, देवीदास वाघ यांनी मार्गदर्शन केले. दौलत भोये, कैलास धुळे, अंबादास सोनवणे, दिनकर जाधव आदि मोर्चात सहभागी झाले होते. (वार्ताहर)