वीज दरवाढी विरोधात मोर्चा

By Admin | Updated: July 17, 2016 01:25 IST2016-07-17T01:20:18+5:302016-07-17T01:25:07+5:30

वीज दरवाढी विरोधात मोर्चा

Front against electricity tariff | वीज दरवाढी विरोधात मोर्चा

वीज दरवाढी विरोधात मोर्चा

 नांदगाव : वीज वितरण कंपनीने शेती व घरगुती वापरासाठीच्या वीज दरामध्ये ३३ टक्के वाढ केल्याने शेतकरी व जनतेवर अन्याय होत असून, ही जाचक दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत नांदगाव येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला.
याशिवाय, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, तसेच आमदार पंकज भुजबळ यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या नवीन वीज उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, नांदगाव शहर व 56 खेडी गिरणा पाणीपुरवठा योजनेस अखंड वीजपुरवठा करावा, जुनाट तारा व पोल बदलण्यात यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Front against electricity tariff