कर्मचाऱ्यांना बांधले मैत्रीचे बंध
By Admin | Updated: August 2, 2016 02:20 IST2016-08-02T01:56:20+5:302016-08-02T02:20:19+5:30
जागतिक विश्वमैत्री दिन : सातपूर प्रभागात विविध उपक्रम

कर्मचाऱ्यांना बांधले मैत्रीचे बंध
सातपूर : जागतिक विश्वमैत्री दिवसाचे औचित्य साधत स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या वतीने सातपूर विभागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शासनाच्या निर्देशानुसार दर पंधरा दिवसांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांमुळे देशाचे व शहरामधील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहत असल्यामुळे पहिला दिवस स्वच्छता मित्र म्हणून साजरा करण्यात आला. महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना फ्रेंडशिप पट्टी बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदरचा उपक्रम सातपूर विभागात काही प्रभागांत राबविण्यात आला. सातपूर प्रभाग क्र . २० मध्ये नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी सातपूर येथील मायको दवाखान्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभाग सभापती कार्यालयात सभापती सविता काळे यांनी कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नगरसेवक विलास शिंदे यांच्या वतीने गंगापूरगाव क्रांती चौक येथे स्वच्छता मैत्री दिवसाचा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे, सहायक आरोग्य
अधिकारी डॉ. सुनील बुकाणे, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, उपअभियंता संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवि काळे, संतोष गायकवाड, पी. के. जाधव, माधुरी तांबे, गोविंद कोष्टी,
केतन मारू, ओम खैरनार, अशोक उशिरे, वसंत पंडित, शैलेश बागुल, राजेंद्र नेटावटे, आकाश पगारे, संतोष काळे, चिंतामण पवार आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)