समाजात हवे मैत्रीपूर्ण वातावरण : संतोष गटकळ
By Admin | Updated: March 18, 2017 20:45 IST2017-03-18T20:45:04+5:302017-03-18T20:45:04+5:30
समाजातील विविध घटकांमध्ये मैत्री व सद्भावनेचे वातावरण निर्माण झाल्यास कायद्याची गरज भासणार नाही
समाजात हवे मैत्रीपूर्ण वातावरण : संतोष गटकळ
नाशिक : समाजातील विविध घटकांमध्ये मैत्री व सद्भावनेचे वातावरण निर्माण झाल्यास कायद्याची गरज भासणार नाही, असे प्रतिपादन विधिज्ञ अॅड. संतोष गटकळ यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने ‘नागरी हक्क संरक्षण आणि अनुसूचित जाती-जमाती अधिनियम’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रावसाहेब थोरात झालेल्या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून गटकळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपआयुक्त काशीनाथ गवळे, डॉ. सचिन परब, राजयोग ध्यानधारणा केंद्राच्या वासंती दिदी, सहायक आयुक्त प्राची वाजे, ‘देशदूत’चे सहायक संचालक विश्वास देवकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गटकळ म्हणाले, राज्य घटनेने समानतेचे तत्त्व लागू करण्यासाठी सर्वांना सार्वजनिक स्त्रोताचा निर्भयतेने वापर करत मार्गदर्शक तत्त्वे दाखविली आहेत; मात्र समाजात परस्पर विरोधी विचारसरणीमुळे आंदोलन, मोर्चे यांसारख्या माध्यमातून कायद्यांना विरोध होतो. न्याय तत्त्वांची अंमलबजावणी करताना योग्य विचारांची गरज निर्माण होते. यासाठी घटनेने नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ साली निर्माण केला. या कायद्यावर मर्यादा आल्याने अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ लागू करण्यात आला. २०१५ साली यामध्ये काही सुधारणा झाल्या. याचा मुख्य उद्देश समाजातील विविध स्तरांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरणाची निर्मिती होणे, असा आहे