वणी येथील संशयितांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

By Admin | Updated: January 25, 2016 22:51 IST2016-01-25T22:51:52+5:302016-01-25T22:51:52+5:30

वणी येथील संशयितांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

Friday's hearing on the bail application of the accused in Wani | वणी येथील संशयितांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

वणी येथील संशयितांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

वणी : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या संस्थेचा नोंदणी क्रमांक वस्तू विक्रीवाढ योजनेसाठी बेकायदेशीररीत्या वापरून आर्थिक फायद्यासाठी योजना चालविल्या प्रकरणी गुन्हा दाखल असणाऱ्या सात संशयितांच्या अटकपूर्व जामिनासाठीची सुनावणी येत्या २९ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.
वणी येथील श्री महारु द्र हनुमान सेवा समिती या संस्थेचा अधिकृत नोंदणी क्र मांक श्री महारुद्र हनुमान सेवा समिती मल्टी सर्व्हिसेस असे योजनेच्या माहिती पुस्तिकेवर प्रकाशित करून वस्तू विक्रीवाढ योजना सात संशयितांनी सुरू केली होती. समितीच्या अधिकृत विश्वस्तांच्या तक्रारीवरून सात संशयितांविरोधात फसवणूक, कट रचणे, बनावटीकरण, विश्वासघात, संगनमत अशा बाबींच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांचा तपास सुरू असताना सातही संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अटकेची कारवाई टाळण्यासाठी या संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला होता. मात्र या निर्णयाबाबत दुसरी सुनावणी २९ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. (वार्ताहर)
’ अस्ताणे : येथील पिवळीपाटी जवळील शेतातील वाड्यातून अज्ञात चोरट्यांनी गाय चोरून नेली. परिसरात भुरट्या चोऱ्या पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे. बाळू देवरे यांच्या वाड्यात बांधलेली गाय चोरून नेत रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पोबारा केला.

Web Title: Friday's hearing on the bail application of the accused in Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.