शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आॅटो डीसीआरबाबत शुक्रवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:46 IST

बांधकाम व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने घरबांधणीतील अडसर ठरलेल्या आॅटो डीसीआर संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी येत्या शुक्रवारी (दि.२१) कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून, यावेळी अनेक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे.

नाशिक : बांधकाम व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने घरबांधणीतील अडसर ठरलेल्या आॅटो डीसीआर संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी येत्या शुक्रवारी (दि.२१) कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून, यावेळी अनेक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे.  बांधकाम परवानगी देताना पारदर्र्शकता असावी तसेच वेगाने हे काम व्हावे, यासाठी महापालिकेच्या वतीने वर्षभरापूर्वी आॅटो डीसीआर हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात आले आहे, परंतु रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती असून, हे सॉॅफ्टवेअर आल्यानंतर नवीन बांधकाम प्रकरणे दाखल होणेच बंद झाले आहे. प्रस्ताव अपलोड केल्यानंतर किरकोळ आणि हास्यास्पद कारणांसाठी प्रकरणे नाकारली जात आहेत. बांधकाम परवानगीच्या पीडीएफ आॅर्डर तसेच पूर्णत्वाचा दाखलाही मिळत नसल्याने व्यावसायिक त्रस्त असून, आॅनलाइनपेक्षा आॅफलाइन प्रकरणे दाखल करा, अशी मागणी जोर धरत आहे.महापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त अभिषेक कृष्ण आणि तुकाराम मुंढे यांच्याकडून हा प्रश्न सुटला नसल्याने आता नव्या आयुक्तांना बांधकाम संघटनांनी साकडे घातले आहे. यासंदर्भात आयुक्त गमे यांनी २१ डिसेंबर रोजी बैठक बोलावली असून, त्यातून तोडगा निघण्याची शक्यता आहे. संबंधित कंपनीने काम कोणत्याही प्रकारे थांबविल्याचा इन्कार आयुक्त गमे यांनी केला. तसेच कंपनीचे देयक प्रलंबित असून, कंपनी काम करीत असल्याने ते देण्यास हरकत नसल्याचे आयुक्त म्हणाले.दरम्यान, महापालिकेतील विविध प्रलंबित कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला असून, आता मार्चपर्यंत तरतूद असलेली रक्कम खर्च व्हावी यासाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेशदेखील खाते प्रमुखांना देण्यात आल्याचे गमे यांनी सांगितले. नगरसेवक निधीतील दोन लाख रुपयांचा निधी एका प्रभागातील चारही नगरसेवकांनी सरेंडर केल्यास आठ लाख रुपयांचे मोठे काम करण्याबाबतदेखील खाते प्रमुखांना सूचित करण्यात आले असून, त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे गमे यांनी सांगितले.२१ कोटी अदा करणे नियमानुसारच?आकाशवाणी केंद्राजवळील भूखंडापोटी २१ कोटी रुपयांचा मोबदला देण्याच्या विषयावर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रथमच भाष्य करताना त्यांनी आपण फाईली तपासल्या आहेत. मोबदला देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश २०१६ मधील आहेत. त्याचप्रमाणे स्थायी समितीने ताजा कोणताही ठराव करून रक्कम देण्यास विरोध केला नव्हता. सभागृह नेते दिनकर पाटील यांचे पत्र मात्र फाईलमध्ये होते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्थायी समितीच्या बारा सदस्यांनी रक्कम देण्यास आक्षेप घेणारे पत्र नेमके कोठे गेले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक