ठाकरेंचा आयुक्तांना ‘फ्री हॅण्ड’
By Admin | Updated: November 28, 2014 23:41 IST2014-11-28T23:41:21+5:302014-11-28T23:41:33+5:30
विकासकामांचा मुहूर्त : शहर सुधारणेबाबत झाली चर्चा

ठाकरेंचा आयुक्तांना ‘फ्री हॅण्ड’
नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिक महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसल्याने शहरातील विकासकामे खोळंबल्याची तक्रार करणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीनंतर प्रथमच शहरात येत नवनियुक्त मनपा आयुक्तांची भेट घेतली.
या भेटीत मनसेच्या विकासकामांना मुहूर्त मिळू द्या, अशी मागणी करतानाच तुमच्या धडाडीप्रमाणे काम करा, पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन देतानाच मुक्त वातावरणात काम करण्याचे आवाहनही केले. या भेटीत राज ठाकरे यांनी आयुक्तांना मनसेच्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. महत्त्वाकांक्षी गोदापार्क प्रकल्पाशिवाय सिंहस्थाअंतर्गत रखडलेली विकासकामे आणि अपेक्षित असलेली कामे पूर्णत्वाबाबत ठाकरेयांनी आयुक्तांशी चर्चा केली.