शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

मोदी यांच्याविरोधात ‘आप’चा मोफत चहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 12:43 AM

‘दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार’ असे आश्वासन देत मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले होते. परंतु साडेचार वर्षे उलटूनही हे सरकार ना रोजगार, ना उद्योगपूरक शासकीय योजना राबवित आहे, असा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या नाशिकमधून युवा आघाडीने शालिमार परिसरात सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीसह ‘चहा व पकोड्यांचे’ मोफत वाटप करीत आंदोलन केले.

ठळक मुद्देअभिनव आंदोलन : डॉक्टर, वकीलची वेशभूषा

नाशिक : ‘दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार’ असे आश्वासन देत मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले होते. परंतु साडेचार वर्षे उलटूनही हे सरकार ना रोजगार, ना उद्योगपूरक शासकीय योजना राबवित आहे, असा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या नाशिकमधून युवा आघाडीने शालिमार परिसरात सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीसह ‘चहा व पकोड्यांचे’ मोफत वाटप करीत आंदोलन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी युवकांना २ कोटी रोजगार देण्याचे वचन दिले होते. परंतु नवीन रोजगार निर्माण झालेच नाही, शिवाय नोटबंदी, जीएसटीच्या तुघलकी निर्णयाने अनेक रोजगार बुडाल्याचा आरोप आपच्या युवा आघाडीने केला आहे. आता प्रधानमंत्री युवकांना पकोडे विकून रोजगार मिळविण्याचे सल्ले देत आहेत. याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने डॉक्टर, वकील, इंजिनियर यांची वेशभूषा करून कार्यकर्त्यांनी नागरिकांना मोफत चहाचे वाटप केले. तसेच मोदी-फडणवीस हाय हाय, नोकरी नाही-रोजगार नाही या सरकारला लाज नाही, रोजगार न देणाऱ्या सरकारचा निषेध असो, भाई मांगे-नोकरी; बहन मांगे नोकरी, मालाला दाम-हाताला काम मिळालंच पाहिजे यांसारख्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, युवाध्यक्ष योगेश कापसे, जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, एकनाथ सावळे, अनिल कौशिक, अल्ताफ शेख, महेंद्र मगर, सुमित शर्मा, अल्बाशी शेख, साहिल सिंग, शुभम पडवळ, रमेश मराठे काका, विनायक येवले, विश्वजित सावंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदी