१२० भटक्या श्वानांना मोफत ‘रेबीज

By Admin | Updated: January 10, 2016 23:38 IST2016-01-10T23:37:44+5:302016-01-10T23:38:46+5:30

’तीन केंद्रांवर लसीकरण : नॅशनल अ‍ॅनिमल राईट फाउंडेशनचा उपक्रम

Free 'rabies' for 120 drunken dogs | १२० भटक्या श्वानांना मोफत ‘रेबीज

१२० भटक्या श्वानांना मोफत ‘रेबीज

नाशिक : शहरातील भटक्या श्वानांच्या उपद्रवाबाबत नेहमीच ओरड केली जाते. शहरातील नॅशनल अ‍ॅनिमल राईट फाउंडेशन या प्राणिप्रेमी संघटनेच्या वतीने भटक्या श्वानांकरिता मोफत ‘रेबीज’ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेदरम्यान, सुमारे १२० भटक्या श्वानांना रेबीज लस देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
यावेळी भूतदयेपोटी दररोज सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारताना शहरातील काही निर्जन रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या श्वानांच्या झुंडींना बिस्किटे, दूध, घरातील शिल्लक राहिलेल्या पोळ्या आदि प्रकारचे खाद्य टाकू न त्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न करणारे काही प्राणिप्रेमीही आहेत.
अशाच काही प्राणिप्रेमींचा लळा त्या भागातील श्वानांनाही लागणे स्वाभाविकच असून संस्थेने आयोजित केलेल्या तीन केंद्रांवर श्वानप्रेमींच्या मदतीने भटक्या श्वानांना आणून मोफत रेबीज लस देण्यात आली. तसेच जंतुनाशक पावडर लावण्यात आली. भटक्या श्वानांच्या लसीकरण शिबिराचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बी. आर. ठाकूर, अमोल नाडे, विनायक कुराडे, राकेश खैरनार, शीतल सोनवणे उपस्थित होते.

Web Title: Free 'rabies' for 120 drunken dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.