चार हजार किलोमीटर प्रवास मोफत निव्वळ अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 06:07 PM2019-05-29T18:07:23+5:302019-05-29T18:07:54+5:30

सप्तशृंगगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) याच्या वतीने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी मोफत प्रवास असा मोबाईलवर फेक मेसेज येत असल्याने लोकांची, विशेषत: जेठ्य नागरीकांची खिल्ली उडविली जात आहे.

Free net rumors for four thousand kilometers of travel | चार हजार किलोमीटर प्रवास मोफत निव्वळ अफवा

चार हजार किलोमीटर प्रवास मोफत निव्वळ अफवा

Next
ठळक मुद्देसप्तशृंगगड : नागरीकांनी विश्वास न ठेवण्याचे एस.टी. महामंडळाचे आवाहन

सप्तशृंगगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) याच्या वतीने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी मोफत प्रवास असा मोबाईलवर फेक मेसेज येत असल्याने लोकांची, विशेषत: जेठ्य नागरीकांची खिल्ली उडविली जात आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून जेष्ठ नागरीकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सूरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत चारहजार किलो मीटरचा एसटी प्रवास मोफत करता येणार आहे. त्या करीता महामंडळाकडून स्मार्ट कार्ड प्राप्त करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा मतदान स्लिप आणि ५५ रूपये घेऊन जवळच्या एसटी डेपोत जावे लागेल. वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत आहे, काही भागात ही वेळ वेगळी असू शकेल. असा मेसेज गेल्या पधंरा दिवसांपासून व्हाटस अ‍ॅपद्वारे सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ५५ रूपांयात जेष्ठ नागरीकांसाठी चार हजार किलो मीटरचा एसटी बस प्रवास मोफत मिळणार असल्याकारणाने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे जेष्ठ नागरीकांमध्ये चर्चेचा विषय होत आहे. परंतू काहींनी या मोफत प्रवासाविषयी भ्रमनध्वनीवरून कळवण डेपो मॅनेजर यांच्याशी सपंर्क साधला असता, ही सर्व अफवा असून आम्ही या विषयी मुंबई सेंट्रल डेपोशी या बाबत विचारणा केली असता आम्ही अशी कूठलीही योजना काढली नसून निव्वळ सोशल मिडीयावर ही अफवा पसरवली जात असल्याची कबूली डेपो मॅनेजर यांनी सांगितले. त्यामुळे या अफवावंर नागरीकांनी व प्रवाशांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
(फोटो २९ एसटी)

Web Title: Free net rumors for four thousand kilometers of travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.