कुंभाळेत बिबट्याचा मुक्त संचार
By Admin | Updated: April 28, 2017 01:21 IST2017-04-28T01:21:12+5:302017-04-28T01:21:20+5:30
पेठ : गत आठ दिवसांपासून कुंभाळे व खडकी परिसरात एक मादी बिबट्याचा आपल्या दोन बछड्यांसह मुक्त संचार सुरू आहे.

कुंभाळेत बिबट्याचा मुक्त संचार
पेठ : गत आठ दिवसांपासून कुंभाळे व खडकी परिसरात एक मादी बिबट्याचा आपल्या दोन बछड्यांसह मुक्त संचार सुरू असून, यामुळे शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुंभाळेसह खडकी, बोरीचीबारी परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या खाजगी जागेत बऱ्यापैकी सागवान लागवड करून त्याची जोपासना
केली आहे. शिवाय जंगलात पाणी नसल्याने गत आठवड्यापासून एक मादी आपल्या दोन बछड्यांसह शिवारात हिंडताना अनेकांच्या नजरेस पडली. यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी सायंकाळच्या वेळी बाहेर पडणेच थांबवले असून, शेतात झोपडी
करून वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पिंपळदर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार
सटाणा तालुक्यातील पिंपळदर शिवारात बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करत पडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आला. येथील शेतकरी विनायक पवार यांचा पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्यास ठार केले. सकाळी कुत्र्याची अवस्था बघितल्यानंतर शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. पिंपळदर गाव राखीव डोंगरापासून जवळ असून, वन्य प्राणी हे अन्न व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.