लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST2021-08-13T04:19:13+5:302021-08-13T04:19:13+5:30
नाशिक : शहरातील प्रसिद्ध मल्टिस्पेशालिटी एनएबीएच मान्यता प्राप्त ‘लोकमान्य हॉस्पिटल’मध्ये स्वातंत्र्य दिनापासून मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. महात्मा ...

लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया
नाशिक : शहरातील प्रसिद्ध मल्टिस्पेशालिटी एनएबीएच मान्यता प्राप्त ‘लोकमान्य हॉस्पिटल’मध्ये स्वातंत्र्य दिनापासून मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. महात्मा जोतीराव फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मोफत ॲन्जिओप्लास्टी व बायपास तसेच लहान मुलांमधील शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी हॉस्पिटलचे प्रसिद्ध बायपास सर्जन डॉ. नीलेश पुरकर, डॉ. नितीन ठाकरे, हृदयरोग व कार्डिओलॉजिस्ट डॉ. रोहित ठाकरे, डॉ. नीलेश तावडे, डॉ. गगन शर्मा, डॉ. ओंकार गवळी व पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. ललित लवणकर यांनी दिली. हॉस्पिटलकडे सुसज्ज कॅथलॅब, कार्डियाक आयसीयू, कार्डियाक एनआयसीयू व कार्डियाक ऑपरेशन थिएटर सोबतच तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असल्याने या सेवेला नाशिककर चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.