महिलांची मोफत आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:28 IST2021-02-21T04:28:26+5:302021-02-21T04:28:26+5:30

उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे या होत्या. तर प्रमुख ...

Free health check up for women | महिलांची मोफत आरोग्य तपासणी

महिलांची मोफत आरोग्य तपासणी

उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलेजा कुप्पास्वामी उपस्थित होते.

महिलांची आरोग्य तपासणी डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, डॉ. संजय जाधव, डॉ. प्रवीण जाधव, पंकज पाटील, डॉ. सोनवणे, डॉ. शिरसाठ यांनी केली. महिलांना वाण म्हणून कोविडच्या पार्श्‍वभूमीवर मास्क भेट देण्यात आले. तपासणी केलेल्या महिलांना आरोग्यविषयीचे कार्ड देण्याची संकल्पना जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी यावेळी बोलतांना मांडली.

कार्यक्रमास शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा राजश्री पहिलवान, उपाध्यक्ष अलका जेजुरकर, हेमलता गायकवाड, नर्गिस शेख, विमल शाह, रामेश्वरी कडतन, निशा कांबळे, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, वर्षा लिंगायत, प्रतीक्षा लिंगायत आदींसह महिला उपस्थित होत्या.

फोटो- २० वूमेन हेल्थ

===Photopath===

200221\20nsk_49_20022021_13.jpg

===Caption===

पुष्पलता उदावंत, वर्षा लिंगायत, प्रतिक्षा लिंगायत आदींसह महिला उपस्थित होत्या. फोटो- २० वूमेन हेल्थ 

Web Title: Free health check up for women