सटाणा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:14 IST2021-09-03T04:14:25+5:302021-09-03T04:14:25+5:30

बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या शनिवारी (दि. ४) येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...

Free health check-up camp at Santana | सटाणा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सटाणा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या शनिवारी (दि. ४) येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बाजार समितीचे माजी सभापती रमेश देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक श्रीधर कोठावदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल, तर सटाणा किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र राका व बागलाण एज्युकेशन सोसायटीचे संचालक अशोक निकम हे प्रमुख पाहुणे असतील. प्रसिद्ध नेत्रतज्ञ लेफ्टनंट कर्नल आर. वसंथ कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात तज्ञ नेत्रचिकित्सकांकडून मोफत तपासणी, मधुमेह, रक्तदाब, मोतीबिंदू, रेटिना, व चष्म्याचा नंबर काढून मिळेल. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी सटाणा व नामपुर शाखेतील भरत पवार, जितेंद्र बागड, मिलिंद शिवदे यांच्याशी संपर्क साधावा.

यावेळी उपाध्यक्ष कल्पना येवला, संचालक पंकज ततार, जयवंत येवला, शरद सोनवणे, दिलीप चव्हाण, प्रवीण बागड, रुपाली कोठावदे, प्रकाश सोनग्रा, जगदीश मुंडावरे, तुषार खैरनार, महेश देवरे आदी उपस्थित होते. (वा.प्र.) (समको अध्यक्ष कैलास येवला याचा फोटो वापरावा)

Web Title: Free health check-up camp at Santana