शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात जिल्'ात मोफत मार्गदर्शन
By Admin | Updated: November 18, 2014 00:35 IST2014-11-18T00:31:23+5:302014-11-18T00:35:06+5:30
शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात जिल्'ात मोफत मार्गदर्शन

शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात जिल्'ात मोफत मार्गदर्शन
नाशिक : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीसंबंधी श्री ज्योतीच्या वतीने जिल्'ात मोफत मार्गदर्शनपर व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात आले असून, या मालेचा शुभारंभ नुकताच झाला. यंदा जिल्'ातून या परीक्षेसाठी सुमारे २७ हजार विद्यार्थी बसले असून, त्यांना या व्याख्यानमालेचा लाभ होणार असल्याचे श्रीज्योतीचे संचालक ज्योतीराव खैरनार यांनी सांगितले. सर्व डीएड, बीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. मागील वर्षी या परीक्षेसाठी राज्यभरातून सात लाख विद्यार्थी बसले होते. निकाल फक्त ३ टक्के इतका लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी भीती निर्माण झाली आहे. ही भीती घालविण्यासाठी श्रीज्योतीने पुढाकार घेत मार्गदर्शनपर विनामूल्य व्याख्यनमालेचे आयोजन केले आहे. नाशिकमध्ये मालेची दोन सत्रे नुकतीच झाली. पहिल्या सत्राला आमदार सीमा हिरे, तर दुसऱ्या सत्राला आमदार बाळासाहेब सानप आणि आमदार राहुल अहेर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तिसरे सत्र येत्या २३ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले आहे. सदर मोफत मार्गदर्शन सत्र घेण्यासाठी जिल्'ातील लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेतला असून, येत्या २१ नोव्हेंबरला सुरगाणा येथे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी, तर ३० नोव्हेंबरला आमदार छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या येवला व नांदगाव मतदारसंघात व्याख्यान होणार आहे. ३० नोव्हेंबरला आमदार सुधीर तांबे यांनी संगमनेर येथे व्याख्यानाचे आयोजन केले आहे. याशिवाय चांदवड, सटाणा येथेही व्याख्यानांचे नियोजन आहे.