५१ गरजूंना महिनाभराचा मोफत किराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST2021-06-22T04:11:00+5:302021-06-22T04:11:00+5:30

राज्यभरात बाजारपेठा, उद्योगधंदे हळूहळू अनलॉक होऊ लागले असले तरी लगेचच परिस्थितीत बदल होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन संस्थेचे ...

Free groceries for 51 needy people for a month | ५१ गरजूंना महिनाभराचा मोफत किराणा

५१ गरजूंना महिनाभराचा मोफत किराणा

राज्यभरात बाजारपेठा, उद्योगधंदे हळूहळू अनलॉक होऊ लागले असले तरी लगेचच परिस्थितीत बदल होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष राहुल चोथवे यांनी परिट गल्ली, तानाजी चौक, क्रांती चौक, कुंभार गल्ली, शेटे गल्ली, न्हावी गल्ली, जाखडी गल्ली आदी भागातील गरजू कुटुंबांची संख्या लक्षात घेतली. त्यानुसार पुढील एक महिना पुरेल एवढा प्रत्येकी दीड हजार रुपये किमतीचा किराणा देण्यात आला. यावेळी श्रीमती वत्सला चोथवे, चंद्रकांत गड्डम, संतोष दातरंगे, संदीप भोर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोनिका अंकार, सायली निऱ्हाळी, राजकुमार यादव, विकास यादव, संदीप नन्नावरे, कृष्णा जोरी, पांडुरंग पैंजणे, पीयूष नवले, विकास आढार, अशोक कांबळे यांचे सहकार्य लाभले.

इन्फो

महिनाभर मोफत भोजन सेवा

चोथवे चॅरिटेबल ट्रस्ट, विमल वस्त्र भांडार व साईबाबा पतसंस्थेने लॉकडाऊन काळात दररोज ५०० लोकांना मोफत भोजन व्यवस्था पुरविली. येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांनीदेखील आवश्यकतेनुसार या भोजन सेवेचा लाभ घेतला. जवळपास महिनाभर नियमतिपणे हा उपक्रम राबविण्यात आला.

फोटो- २१ सिन्नर चोथवे

सिन्नरमधील ५१ गरजू कुटुंबांना एक महिन्याचा मोफत किराणा वाटप करण्यात आला. त्याप्रसंगी राहुल चोथवे, महेंद्रकुमार तारगे, डॉ. प्राणेश सानप, वत्सला चोथवे, चंद्रकांत गड्डम, संतोष दातरंगे यांच्यासह कर्मचारी.

===Photopath===

210621\21nsk_37_21062021_13.jpg

===Caption===

फोटो- २१ सिन्नर चोथवे सिन्नरमधील ५१ गरजू कुटुंबांना एक महिन्याचा मोफत किराणा वाटप करण्यात आला. त्याप्रसंगी राहुल चोथवे, महेंद्रकुमार तारगे, डॉ. प्राणेश सानप, वत्सला चोथवे, चंद्रकांत गड्डम, संतोष दातरंगे यांच्यासह कर्मचारी.  

Web Title: Free groceries for 51 needy people for a month