आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मोफत खते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:15 IST2021-04-28T04:15:43+5:302021-04-28T04:15:43+5:30
शेतकरी आत्महत्या ही घटना अत्यंत दु:खदायक व क्लेशदायक आहे. कोरोनाच्या संकटात त्यांच्या कुटुंबास खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते. मालेगाव ...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मोफत खते
शेतकरी आत्महत्या ही घटना अत्यंत दु:खदायक व क्लेशदायक आहे. कोरोनाच्या संकटात त्यांच्या कुटुंबास खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते. मालेगाव तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या माध्यमातून नियमितपणे दरवर्षी अशा कुटुंबांना अल्पशी मदत देऊन दिलासा देण्याचे काम अविरतपणे सुरू असते. सामाजिक बांधिलकीतून करण्यात येणाऱ्या मदतीचे इतर सामाजिक संस्थांनी देखील अनुकरण करून मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन भुसे यांनी यावेळी केले. भुसे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात टेहरे येथील कै. बापू शेवाळे यांच्या पत्नी संगीता शेवाळे तर खडकी येथील कै. संदीप शेळके यांच्या आई निंबाबाई शेळके या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास मदतीचे वाटप करण्यात आले. इतर सर्व पात्र लाभार्थींच्या घरपोच ही मदत पुरविण्यात येणार असल्याचे ॲग्रो डीलर्सच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, संजय दुसाणे, प्रांताधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, विनोद वाघ, भगवान मालपुरे, अशोक देसले, अनिल निकम, अविनाश निकम, दिलीप मालपुरे, बाळासाहेब शिरसाठ, दशपुते आदी उपस्थित होते.