येवला तालुक्यात हरणांचा मुक्त संचार
By Admin | Updated: July 16, 2017 00:59 IST2017-07-16T00:58:58+5:302017-07-16T00:59:11+5:30
येवला : वातावरणात काहीसा गारवा काही प्रमाणात पावसाच्या शिडकावा झाल्यामुळे राजापूर, ममदापूर वनक्षेत्रात हिरवळ वाढली असून, या भागात हरणे मुक्त संचार करत असल्याचा अनुभव सध्या परिसरात येत आहे.

येवला तालुक्यात हरणांचा मुक्त संचार
दत्ता महाले।
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : बदललेल्या हवामानामुळे वातावरणात काहीसा गारवा काही प्रमाणात पावसाच्या शिडकावा झाल्यामुळे राजापूर, ममदापूर वनक्षेत्रात हिरवळ वाढली असून, या भागात हरणे मुक्त संचार करत असल्याचा अनुभव सध्या परिसरात येत आहे. हरणांचे मोठे मोठे कळप दिसत असल्याने वनसंवर्धन क्षेत्रात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. येवल्याच्या उत्तर पूर्व भागातील राजापूर, ममदापूर परिसरात पाच हजार ४४५ हेक्टर वनजमिनीवर वनविभागाच्या माहितीनुसार हरीण व कालविटाची संख्या १०८० असून, ३५ लांडगे, सहा तरस, ४६० मोर आहेत. तसेच रानमांजर, ससे अशा अनेक प्रकारचे पशु-पक्षी येथे पहावयास मिळतात. या पशु-पक्ष्यांचे संवर्धन होऊन यांची संख्या वाढावी यासाठी हरणांना हक्काचे घर असावे म्हणून गावकऱ्यांच्या सहकार्याने शासनाने हा परिसर वनसंवर्धन राखीव म्हणून घोषित केला आहे.