शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात मोफत केमोथेरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 14:45 IST

राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार देशात वर्षभरात समारे ११ लाख कर्करुग्ण आढळून येतात. देशात जुने आणि नवे मिळून सुमारे २८ लाख कर्करुग्णांची संख्या आहे. त्यापैकी पाच लाख मृत्यू दरवर्षी कर्करोगाने होतात. महाराष्ट्रातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याबाबत राज्य शासनातर्फे उपाययोजना केल्या जातात.

ठळक मुद्देजून महिन्यात शुभारंभ : औषथेही मोफत देणारजुनपासून युनिट जिल्हा रुग्णालयात सुरू होणार

नाशिक: कर्करोगावरील उपचारामध्ये महत्वाची भमिका असणाऱ्या केमोथेरीपीची मोफत सुविधा आता नाशिक जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार असून, साधारणता जुन महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. नाशिकसह नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या १० जिल्ह्यांमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून जिल्हा रुग्णालयातील फिजीशिअन आणि नर्स यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार देशात वर्षभरात समारे ११ लाख कर्करुग्ण आढळून येतात. देशात जुने आणि नवे मिळून सुमारे २८ लाख कर्करुग्णांची संख्या आहे. त्यापैकी पाच लाख मृत्यू दरवर्षी कर्करोगाने होतात. महाराष्ट्रातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याबाबत राज्य शासनातर्फे उपाययोजना केल्या जातात. उपचारासोबतच प्रतिबंधात्मक आणि जाणीवजागृतीपर मोहिम हाती घेतली जाते. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात आली. दिवसेंदिवस कर्करोगाचा वाढता प्रसार पाहता त्याच्या उपचारासाठी आरोग्य विभाग आणि टाटा रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.कर्करोगाच्या उपचारात केमोथेरीपी महत्वाची भूमिका बजावते. त्यासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयातर्फे आवश्यकतेनुसार समारे सहा आठवड्यांचा केमोथेरीपी कोर्स रुग्णाला दिला जातो. यासाठी रुग्णाला दर आठवड्याला मुंबईत जावे लागते. त्यांना प्रवासाचा होणारा ताण, आर्थिक ताण ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आता मोफत किमोथेरीपीची सुविधा जिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतला आहे. यासुविधमुळे कर्करुग्णांना स्थानिकस्तरावरच उपचार घेता येणे शक्य होणार आहे. या सुविधेच्या पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. किमोथेरपी औषध देण्याचे प्रशिक्षण प्रत्येक जिल्हा रुग्णालयातील एक फिजीशिअन आणि स्टाफ नर्स यांना देण्यात येणार आहे. टाटा रुग्णालयाच्या सहकायार्ने मेडीकल आॅन्कोलॉजी विभागात तीन आठवड्यांचे हे प्रशिक्षण दिले जाणार असून मे महिन्यापासून पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयांना फिजीशिअन आणि नर्स यांची नावे कळविण्यास सांगितली आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashikनाशिक