शेतकऱ्याची वाशीत साडेआठ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:29+5:302021-08-20T04:19:29+5:30
विंचूरदळवी येथील बापू केशव डांगे हे शेतकरी व भाजीपाला विक्रेते आहेत. त्यांनी १ जानेवारी ते ३० जून २०१८ या ...

शेतकऱ्याची वाशीत साडेआठ लाखांची फसवणूक
विंचूरदळवी येथील बापू केशव डांगे हे शेतकरी व भाजीपाला विक्रेते आहेत. त्यांनी १ जानेवारी ते ३० जून २०१८ या कालावधीत वाशी मार्केट कमिटीतील व्यापारी संशयित अर्जुन रामभाऊ डावखर व शेखर सोपान डावखर यांना कोबीची विक्री केली होती. अर्जुन डावखर यांना ६ लाख ५ हजार रुपयांची २४२ टन कोबी तर शेखर सोपान डावखर यांना २ लाख ५५ हजारांची १०२ टन कोबी विक्री केली होती.
मात्र या दोन्ही व्यापाऱ्यांकडून डांगे यांना पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे डांगे यांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार शेखर डावखर व अर्जुन डावखर या दोन संशयितांविरोधात ठकबाजीचा गुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.