कोठरेतील शेतकऱ्याची साडे अकरा लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:31 IST2020-12-16T04:31:16+5:302020-12-16T04:31:16+5:30

---- आक्षेपार्ह संदेश - व्हिडिओ टाकणाऱ्या विरोधात गुन्हा मालेगाव : इम्रान प्रतापगडी झाबरा या व्हॉटस्‌अप ग्रुपचा सदस्य मोहंमद झाकीर ...

Fraud of Rs | कोठरेतील शेतकऱ्याची साडे अकरा लाखांनी फसवणूक

कोठरेतील शेतकऱ्याची साडे अकरा लाखांनी फसवणूक

----

आक्षेपार्ह संदेश - व्हिडिओ टाकणाऱ्या विरोधात गुन्हा

मालेगाव : इम्रान प्रतापगडी झाबरा या व्हॉटस्‌अप ग्रुपचा सदस्य मोहंमद झाकीर इम्रान भ्रमणध्वनी संच क्रमांक ९७६१८७८६०० ग्रुपच्या ॲडमिनने व्हॉटस्‌अप ग्रुपवर आक्षेपार्ह धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश व व्हिडिओ टाकून एकोपा टिकविण्यास बाधक असे कृत्य केले म्हणून आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मुन्शी शाबान नगरात ही घटना घडली. पोलीस नाईक शिरोळे यांनी फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस नाईक भगरे करीत आहेत.

----

भाजप व्यापारी आघाडी कार्यकारिणी जाहीर

मालेगाव : येथील भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रकाश सुराणा यांनी कार्यकारिणी जाहीर केली असून, उपाध्यक्षपदी रूपेश कांकरिया, पारस अग्रवाल, नीरज खंडेलवाल, रवींद्र शर्मा यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी वालचंद छाजेड, चिटणीस घनश्याम शर्मा, सौरभ कोतकर यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून पारस बाफना, संजय छाजेड, रामचंद्र जेधे, सुरेंद्र पहाडे, व्यंकटेश मारू यांची निवड करण्यात आली.

Web Title: Fraud of Rs