लग्न जमवून देण्यासाठी ५ लाख रुपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:15 IST2021-05-13T04:15:13+5:302021-05-13T04:15:13+5:30

भाऊलाल तोताराम सुमराव यांनी याप्रकरणी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसानी संशयित शिवा रमेश भाट, जयसिंग रमेश ...

Fraud of Rs 5 lakh for marriage | लग्न जमवून देण्यासाठी ५ लाख रुपयांची फसवणूक

लग्न जमवून देण्यासाठी ५ लाख रुपयांची फसवणूक

भाऊलाल तोताराम सुमराव यांनी याप्रकरणी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसानी संशयित शिवा रमेश भाट, जयसिंग रमेश भाट, अर्जुन रामसिंग चव्हाण (सर्व रा. शेरुळ, ता. मालेगाव), संतोष भिका सारंग (रा. पिंजारपाडा, ता.चाळीसगाव), संगीता लक्ष्मण म्हस्के, चित्रा अशोक चौधरी (दोघे रा.जालना) आकाश पांडुरंग सोनवणे व विजय विराटे ( दोघे. रा. औरंगाबाद) यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी फिर्यादी भाऊलाल सुमराव यांचा विश्वास संपादन करून त्याच्यासोबत संशयित मुलीचे लग्न लावून देण्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपये घेतले. परंतु संशयित मुलीने ‘मला तुझ्यासोबत राहायचे नाही, मला जालना येथे पोहोचवून दे, नाहीतर माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन’, अशी धमकी दिली. त्यानंतर संशयितांनी आमची मुलगी आमच्या ताब्यात द्या, तुमचे पैसे परत देतो म्हणून महामार्गावरील एका हॉटेलच्या आवारात बोलवले. तेथे खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. यापूर्वी अनेकांची या संशयितांनी फसवणूक केली असून नागरिकांनी सावध व्हावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Fraud of Rs 5 lakh for marriage